धाराशिव – दि १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून भव्य लेझीम ताफा मिरवणूक नगरसेवक राणा बनसोडे यांनी आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात आले होते. भीमशौर्य प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी भव्य लेझीम ताफा मिरवणूक काढण्यात आली तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती धाराशिव शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुकलारे,पोलिस उपनिरीक्षक अंभोरे,माजी नगरसेवक प्रदीप घोणे,रमण जाधव,माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख सोमनाथ गुरव,उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,अश्विन सरवदे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक