March 26, 2026

आयुध पूजन उत्साहात साजरे

  • कळंब (महेश फाटक ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयुध पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मुंढे,सहशिक्षिक ज्ञानेश्वर तोडकर,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे हे उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेतील सर्व अवजारांचे पूजन करण्यात आले.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक अविनाश म्हेत्रे,प्रास्ताविक निदेशिका कोमल मगर यांनी तर आभार निदेशक राजकुमार शिंदे यांनी मानले.
    यावेळी प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.अविनाश घोडके,विनोद कसबे,सोनाली धमाले व सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!