June 25, 2025

स्व.भाई बळवंतराव बप्पांचे विचार आत्मसात करून कृतीत आणावेत – प्रा.अर्जुन जाधव

  • कळंब – दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी उपळे रयत शिक्षण प्रसारक संस्था,उपळे (मा) चे माजी अध्यक्ष स्व.भाई बळवंतराव घोगरे यांचा अठरावा स्मृतिदिन हरिभाऊ घोगरे हायस्कूल,उपळे (मा) च्या प्रांगणामध्ये संपन्न झाला.
    सर्वप्रथम मान्यवरांनी बप्पांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष महादेव गवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.अर्जुन जाधव व ढोकी येथील कामगार नेते डी एम.पाटील तसेच शिंगोलीच्या प्रथम नागरिक श्रीमती योगिताताई शिंदे हे होते.
    कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले व बप्पांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलावडे एस. ए यांनी केले.
    अमोल घोगरे यांनी बप्पांच्या कार्याविषयी माहिती विद्यार्थ्यांसमोर विशद केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पाटील डी.एम यांनी बप्पांचा आदर्श व विचारांचा वारसा नेमकेपणाने चालवावा व नवीन पिढीने त्यांचे विचार आत्मसात करावेत असे सांगितले.तर प्रा. अर्जुन जाधव यांनी बप्पांचे विचार आत्मसात करून कृतीत आणावेत असे सांगून बप्पांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य त्यांनी विशद केले.
    अध्यक्षीय समारोप करताना महादेव गवाड यांनी बप्पांच्या विचारावर सर्व विद्यार्थ्यांनी चालावे असे आवाहन केले.
    या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घोगरे,जनरल सेक्रेटरी अरुण घोगरे, सह सेक्रेटरी हनुमंत देशमुख, कार्यकारी मंडळाचे सदस्य अमोल घोगरे,अल्लाउद्दीन शेख गुरुजी तसेच सर्व संस्था पदाधिकारी व सदस्य आणि पंचक्रोशीतील नागरिक,बप्पांचे नातलग,शिक्षण प्रेमी,सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे टी.डी. आणि क्षीरसागर ए.बी.यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती घोगरे बी.ए.यांनी केले.
    कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
error: Content is protected !!