धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 102 कारवाया करुन 96,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-लताबाई बाबासाहेब क्षिरसागर, वय 45 वर्षे, रा. आण्णाभाउ साठेनगर आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि 27.09.2024 रोजी 11.30 वा. सु. आण्णाभाउ साठेनगर आपसिंगा येथे रोडवर अंदाजे 2,100 ₹ किंमतीची 34 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-सुनिल भागवत जमादार, वय 35 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव हे दि 27.09.2024 रोजी 12.30 वा. सु. कोंड ते नितळी बसस्थानकाचे बाजूला अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 50 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-रुपाबाई बिसराम शिंदे, रा.कसबे तडवळे ता. जि. धाराशिव या दि 27.09.2024 रोजी 17.25 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घराजवळील पत्र्याचे शेड मध्ये अंदाजे 5,200 ₹ किंमतीची 65 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शिवाजी महादेव जाधव, वय 28 वर्षे, रा. भंडारवाडी ता. जि. धाराशिव हे दि 27.09.2024 रोजी 16.40 वा. सु. भंडारवाडी पाटी येथील हॉटेल शिवण्याचे जवळ अंदाजे 6,400 ₹ किंमतीची 80 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: आरोपी नामे-सोहेल आरबखान पठाण, वय 29 वर्षे, रा. जनाई मंगल कार्यालयाजवळ सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि 27.09.2024 रोजी 19.30 वा. सु. आठवडा बाजार येथे अंदाजे 1,480 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
लोहारा पोलीस ठाणे: आरोपी नामे-अशोक महादेव कदम, वय 52 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि 27.09.2024 रोजी 13.30 वा. सु. गावातील आपल्या राहते घराचे समोर अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.27.09.2024 रोजी 11.45 वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत मांजरा नदीचे पुलाचे बाजूला मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-समाधान रमेश हौसलमल, रा. भिमनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 11.45 वा. सु. मांजरा नदीचे पुलाचे बाजूला मोकळ्या जागेत सुरट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.09.2024 रोजी 14.30 ते 18.35 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-दत्ता गोरोबा तट, वय 40 खाजानगर कोकाटे कॉम्पलेक्सचे पाठीमागे धाराशिव हा.मु.तुळजापूर नाका धाराशिव ता.जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. आण्णाभाउ साठे चौक ते तुळजापूर जाणारे रोडचे बाजूला आडतलाईन जवळ धाराशिव येथे मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-गोविंद तानाजी विधाते,वय 27 वर्षे, रा. तेरणा इंजिनेरिंग कॉलेज जवळ तुळजापूर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.35 वा. सु. आण्णाभाउ साठे चौक रोड धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 5,010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
उमरगा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- हरी मच्छिंद्र माने, वय 52 वर्षे, व्यवसाय-ट्रक मालक चालक रा.तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांचा ट्रक क्र केए 56-4161 अशोक लिलॅड कंपनीचा सोलो बेळगाव लाल रंगाची व कॅबीनवर बालाजी प्रसन्न असे लिहलेले ज्या मध्ये लोखंडी रॉड भरलेले असा एकुण 20,00,000₹ किंमतीचा हा दि.23.09.2024 रोजी 23.00 ते दि.24.09.2024 रोजी 06.00 वा. सु.सर्विस रोडवर तुरोरी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हरी माने यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- योगेश बाबुराव गंभीरे, वय 41 वर्षे, रा.पापनाश नगर तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 बी.बी 2904 ही दि.22.09.2024 रोजी 23.00 ते दि. 23.09.2024 रोजी 07.00 वा. सु. योगेश गंभीरे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-योगेश गंभीरे यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अनंत दत्तात्रय लवटे, दत्तात्रय शंकर लवटे,अमोल दत्तात्रय लवटे, अंजली अनंत लवटे, सिमा संतोष लवटे, पायल अमोल लवटे, हिराबाई दत्तात्रय लवटे,संतोष दत्तात्रय लवटे सर्व रा. घाटनांदुरी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.09.2024 रोजी 08.30 वा. सु.घाटनांदुरी येथे फिर्यादी नामे-वसंत सोनाजी लवटे, वय 56 वर्षे, रा.घाटनांदुरी ता. भुम जि. धाराशिव यांची पत्नी उषा लवटे यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वसंत लवटे यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118( 1), 115(2), 189(2), 190, 191(2), 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-विशाल रमेश चौरे, वय 28 वर्षे, रा. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.31.08.2024 रोजी 14.00 वा. सु.खामसवाडी येथे फिर्यादी नामे-सोनाली खुडु बोराडे, वय 33 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांना व त्यांची मुलगी राधा यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोनाली बोराडे यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात.”
कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-आयोध्याबाई नागनाथ कोल्हे, वय 80 वर्षे, रा. वाकडी केज ता.कळंब जि. धाराशिव या दि.27.09.2024 रोजी 12.30 वा. सु. नदीवर कपडे धुवून कोठाळवाडी ते वाकडी रोडवरुन घरी जात होत्या. दरम्यान भागवत वाघमारे यांचे घरासमोर वाकडी येथे टाटा सुमो क्र एमएच 13 बी एन 0853 चा चालक आरोपी नामे- विनोद सोपान रणदिवे, रा. वाकडी केज ता. कळंब जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील टाटा सुमो ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मागे रिवस घेताना आयोध्याबाई कोल्हे यांना धडक दिली. या अपघातात आयोध्याबाई कोल्हे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या.अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- मगरध्वज नागनाथ कोल्हे, वय 55 वर्षे, रा. वाकडी केज ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1), 125(ए) 125(बी) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-अब्दुल जब्बार हजरत अली आतार, रा. मुन्शी प्लॉट उमरगा ता. उमरगा सोबत मयत नामे-मुद्दसर उर्फ मुदरसर राजेसाब आतार वय 20 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.23.09.2024 रोजी 17.40 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 बी बी 2767 वरुन जात होते. दरम्यान उमरगा ते एंकोडी जाणारे रोडवर मलंग कॉम्पलेक्स जवळ उमरगा येथे आरोपी अब्दुल अब्बार आतार यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अचानक समोरील ब्रेक दाबल्याने पाठीमागे बसलेला मुद्दसर आतार हा रोडवर पडल्याने गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या मयताचे वडील फिर्यादी नामे- राजेसाहब दस्तगीर आतार,वय 54 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 281, 125(ए), 106(1)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील