August 9, 2025

महाविद्यालये व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम- अनिल कुलकर्णी

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे आंतरिक गुण कक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक गोष्टी आणि व्यवसाय समुपदेशन ” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक 20 -10 2023 आणि 21-10-2023 रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी महाविद्यालये ही व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळा आहेत आहेत, व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या सुविधा व पूरक गोष्टी उत्तमपणे पुरविण्याचे उपक्रम महाविद्यालयामध्ये घेतले जातात त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले तसेच त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व विद्यार्थी आपल्या सर्वांगीण विकासाच्या दिशा ठरवू शकतात असे उदगार प्रशिक्षक अनिल कुलकर्णी ( अल्ट्रा स्किल, पुणे) यांनी मांडले. आपल्या मनोगतामध्ये बोलताना ते म्हणाले विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून शिक्षकांच्या बरोबरीने पालकांनी त्यांना उर्जाव्यवस्थेमध्ये आणण्याचा ध्यास घेऊन काम केल्यास विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल शैक्षणिक विकासाबरोबरच इतर” व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक गोष्टी” या विषयावर दिनांक 20 -10-23 रोजी कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले या दिवशी त्यांनी व उज्वल करियर घडवण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन केले व दिनांक 21-10-23 रोजी मुलाखतीसाठी कोणती व कशी तयारी करावी व नोकरी मार्गदर्शन केले, महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांचे अंतिम शिक्षण नसून ते एक व्यावसायिक क्षेत्राचा प्रारंभ असला पाहिजे कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आपण एक चांगली व्यक्ती होणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलाकर जाधव व आभार आंतरिक गुणकक्ष समन्वयक प्रा. अर्चना मुखेडकर यांनी मानले. या कार्यशाळेस डॉ. ज्ञानेश चिंते ,डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ. श्रीकांत भोसले,डॉ.विश्वजीत म्हस्के डॉ. महाजन ,डॉ.चादर, डॉ. दळवी डॉ.सावंत ,प्रा.पंडित पवार ,प्रा. शिंदे प्रा. आडे , प्रा. टिपरसे ,प्रा. मडके डॉ.फेरे हे उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजिस्टार हनुमंत जाधव, जया पांचाळ, बंडगर ,आदित्य मडके ,रमेश भालेकर यांनी सहकार्य केले सहकार्य केले.
error: Content is protected !!