July 16, 2025

वडार समाजाने योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) अंतर्गत येणारे पैलवान कै.मारूती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ (मर्या), राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (मर्या) यांच्या अंतर्गत विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे.या योजनेचा लाभ वडार समाजातील नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन वसंतराव नाईक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
    वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1),गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-2),१ लाख रुपये थेट कर्ज योजना,बीज भांडवल योजना. या योजनेमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखांपर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील असावा, अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष दरम्यान असावे,अर्जदाराचे बॅक खाते आधारकार्ड लिंक असणे आवश्यक आहे.योजना ही ऑनलाईन असून याकरिता आधारकार्ड,रहिवाशी दाखला,उत्पन्नाचे प्रमाणपत्र , जातीचा दाखला,शाळेचा दाखला, संबधीत व्यावसायचे कोटेशन आणि वाहनासंबधी असल्यास लाईसन्स / परवाना इत्यादी वेबसाईटवर मूळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.
    या योजनांमध्ये वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे ( IR-1) २००,गट कर्ज व्याज परतावा योजनेचे, बीजभांडवल कर्ज योजना,१ रुपये लाख थेट कर्ज योजना २०० असे उदिष्ट जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थीनी अर्ज करण्याकरीता महामंडळाच्या या WWW.VJNT.IN संकेतस्थळाला भेट दयावी.- तसेच उपंकपनी पैलवान कै.मारूती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-1),गट कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-2),बीजभांडवल कर्ज योजना,रूपये १ लाख थेट कर्ज योजना ३० असे उदिष्ट प्राप्त झाले आहे.
    तसेच उपकपनी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-1),गट कर्ज व्याज परतावा योजनेचे (IR-2), बीजभांडवल कर्ज योजना,रूपये १ लाख थेट कर्ज योजना ३० असे उदिष्ट प्राप्त झाले आहे.आधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ (मर्या.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव. फोन. ०२४७२-२९९१५६ येथे संपर्क साधावा,असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक झोंबाडे पी.एम. यांनी केले आहे.
error: Content is protected !!