धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील उमेदवारांनी शासकीय,निमशासकीय कार्यालयामध्ये तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योगामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थ्याची उपस्थिती ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने मान्यता दिली आली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील शासकीय,निमशासकीय कार्यालयामध्ये तसेच खाजगी क्षेत्रातील उद्योगामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांना कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेतले आहे.या योजनेअंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना माहे ऑगस्ट २०२४ चे विद्यावेतन प्रदान करण्यासाठी आयुक्त,कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी उमेदवारांची उपस्थिती http ://cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याबाबत दि.२१ / ०९ / २०२४ रोजी VC द्वारे प्रशिक्षण दिले आहे. तरी जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यलयाने तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माहे ऑगस्ट २०२४ मध्ये रुजू झालेल्या उमेदवारांची उपस्थितीत ( Attendance) http://cmvkpv. mahaswavam.gov.in आपल्या आस्थापनेचा User ID व Password वापरुन उपस्थितीची Online द्वारे नोंद करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला