धाराशिव (जिमाका) – वय वर्षे ६५ व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुसाहय जीवन जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासह तसेच मनःस्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आता लाभार्थ्यांचे ग्रामपंचायतीतही अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे करण्याचे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे. या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिक यांचे वय दि.३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ६५ वर्ष पुर्ण व लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लक्ष रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.पात्र लाभार्थ्यांना चष्मा,श्रवणयंत्र, ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर,फोल्डिंग वॉकर,कमोड खुर्ची,नि – ब्रेस,लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलर इ.साधने उपकरणे खरेदी करण्याकरीता एकवेळ एकरकमी तीन हजार रुपयेच्या मर्यादेत निधी वितरीत करण्यात येईल.तरी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ६५ वर्ष पुर्ण व लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लक्ष रुपयांच्या आत असलेले जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना जिल्हास्तरावर अर्ज सादर करण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना अर्ज सादर करणे सोईचे व्हावे याकरीता पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास अर्ज सादर करावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला