August 9, 2025

लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी विकास गायकवाड यांची निवड

  • मुंबई – पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकशाही पत्रकार संघच्या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपदी विकास भैरू गायकवाड यांची निवड झाल्याचे पत्र लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत (बीबी ) वैद्य यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्यभरात लोकशाही पत्रकार संघामुळे पत्रकारांचे मजबूत संघटन उभारले जात आहे. पत्रकारांना विमा कवच,त्यांच्या पाल्यांचे शिक्षण,घर,नवे तंत्रज्ञान कौशल्य,सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन या प्रश्नांकडे लोकशाही पत्रकार संघाने लक्ष केंद्रित केले असल्याने राज्यभरातील
    पत्रकारांचा देखील मोठा प्रतिसाद लोकशाही पत्रकार संघाला मिळत आहे.
    पत्रकार हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असूनही तो अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे,त्याच्या संरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे,तो लोकशाहीचा महत्वाचा घटक असूनही निराधार असल्याचे दिसते आहे. लोकशाही चे जतन करणे आता लोकशाही पत्रकार संघाचे काम आहे.
    यासोबतच डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही.डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्या पत्रकारांन त्यांचे अधिकार मिळत नाहीत. तसंच विविध घटकाना एकत्रित करून विविध समित्या च्या माध्यमातून विकास कामे करणे,
    ‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी भविष्यात आमची लढाई असेल.ऑनलाईन क्षेत्रात काम करत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा पातळीवरील महत्त्वाच्या पदावर निवड करत काम करण्याची संधी दिली म्हणून सं.अ. भागवत वैद्य (बीबी )व लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व कार्यक्रम मंडळाचे आभार मानले जात आहे.एकंदरीत या निवडीनंतर
    विकास भैरू गायकवाड धाराशिव जिल्हा अध्यक्ष,
    हानमंत सोपान पांडवे देगलूर शहर अध्यक्ष,बालाजी बाबुराव नागसाखरे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यांच्या निवडीचे विविध माध्यमातून स्वागत होत आहे. लोकशाही पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!