कळंब – शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथील धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वर्कशॉपमध्ये दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी “आयुध पूजन ” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती व विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वर्कशॉपमधील सर्व हत्यारांची,साधनांची पूजा करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाड्यातील शेती अवजारे साठी प्रसिध्द असणारे नृसिंह ट्रेलर्स व शेती अवजारे फर्मचे उद्दोजक अशोक काटे,योगेश्वरी वेल्डर्स फेब्रिकेशनचे महारूद्र वाघचौरे व सोशल मिडियाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शुभम राखूंडे यांनी मुलाखतीमधून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांस उत्तरांतून आयुष्यात यश मिळवता येते हे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे व आभार निदेशक विनोद जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक सागर पालके,निदेशिका कोमल मगर, निदेशिका कल्याणी भराटे, लिपिक आदित्य गायकवाड सेवक विनोद कसबे यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात