August 9, 2025

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रस्ताव दाखल करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना कार्यरत आहे.या योजनेंतर्गत पात्र मदरसांची शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.शासन निर्णयातील विहीत निकषांनुसार ही योजना सन २०२४-२५ या वर्षांसाठी जिल्हयात राबविण्यात येणार आहे.त्यानुषंगाने या योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या जिल्हयातील मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे शासन निर्णयामधील विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत.
    सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी या योजनेंतर्गत कालबद्ध कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.इच्छूक मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत आहे.तर अटी व शर्तीनुसार प्राप्त प्रस्तावांची छाननी करून त्रुटींची पुर्तता करून अंतिमरित्या पात्र प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे.दिलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हयातील अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी त्यांचे प्रस्ताव विहीत मुदतीत सादर करावेत.विहीत मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याबाबत नोंद घ्यावी,असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) सुधा साळुंके यांनी केले आहे.
error: Content is protected !!