February 8, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात बहुजन कल्याणाचा मेळावा

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अर्थशास्त्र विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विकास राठोड (निरीक्षक इतर बहुजन कल्याण विभाग,धाराशिव) हे उपस्थित होते.यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आर.बी.पाटील यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत विविध लोककल्याणकारी मुख्य 15 योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली .पुढे त्यांनी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष योजना,वस्तीग्रह संबंधी योजना, मुक्त वसाहत योजना,आश्रम शाळा वस्ती योजना इतर योजनेविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली .अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सुनील पवार यांनी केला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मीनाक्षी जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. मुखेडकर यांनी केले .या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी समन्वयक प्रा अर्चना मुखेडकर, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी जाधव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्य डॉ.श्रीकांत भोसले यांनी केले.यावेळी प्रा.बोंदर, प्रा. टीपरसे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विशाल राठोड, सचिन राठोड,कारभारी हे उपस्थित होते . हा कार्यक्रम यशवीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी उमेश साळुंखे, रमेश भालेकर, अर्जुन वाघमारे, पांचाळ यांनी सहकार्य केले ,याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!