कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ध्येय आणि प्रचंड त्यागातून बहुजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली.ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली,त्यामुळेच आमच्यासारखेच अनेक विद्यार्थी घडले आणि विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत, निश्चितच ही अभिमानाची बाब आहे. संत नामदेवांच्या ‘ज्ञान दीप लावू जगू ‘ ब्रीदवाक्य घेऊन मोहेकर गुरुजींचे शैक्षणिक कार्य अनेक पिढ्यांसाठी महत्वाचे आहे,असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात संस्थेचे माजी विद्यार्थी बी.ए.मैंदर्गी ( संचालक संत तुकाराम मॉडेल स्कुल,लातूर ) यांनी केले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चँरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक आणि निवृत्त कर्मचारी सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,प्रा.अंकुश पाटील, डॉ.डी.एस.जाधव,संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर, ट्रस्टी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चँरिटेबल ट्रस्ट,प्रकाश शिंदे संस्थेचे संचालक आणि सर्व शाखेतील मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन,दीपप्रज्वलन आणि महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी मोहेकर गुरुजींचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य,संस्थेची स्थापना आणि वाटचाल याविषयी माहिती दिली.तसेच गोरगरीब विद्यार्थी हाच केंद्रबिंदू असल्याचे विशद केले. यावेळी विचारमंच आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेतील पारितोषिक विजेते, विविध परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवागौरव (पुष्पहार शाल-प्रमाणपत्र व संस्थेचे बोधचिन्ह चांदीची समई) देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावर्षीचे विविध पुरस्कार यात ज्ञानरत्न उत्कृष्ट माजी विद्यार्थी डॉ.महादेव गव्हाणे (प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर) तर ज्ञानदीप हा आदर्श शिक्षक पुरस्कार वरिष्ठ गटातून फलोत्पादन विभागप्रमुख डॉ. हेमंत चांदोरे (पुष्पहार शाल- प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह) सेवा गौरव लिपीक अनिल पवार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रंथालयाचे उत्कृष्ठ वाचक पुरस्कार डॉ.जे.एस.ढोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयद्रथ जाधव (शिवाजी महाविद्यालय, रेणापूर )म्हणाले, “मराठवाड्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य काम करून लोकसेवेचा वसा निर्माण करणारी ही संस्था आहे. अण्णांनी दिलेला वसा घेऊन आज ही संस्था साठ वर्ष काम करते आहे.शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचे काम अत्यंत निष्ठेने मोहेकर अण्णांनी केले आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख,कर्मवीर मामासाहेब जगदाळे,संत गाडगे महाराज यांच्या पठडीतील आहे. त्याच परंपरेचे पाईक राहून अण्णांनी हा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीकडे प्रदान केलेला आहे.”
सत्काराला उत्तर देताना संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ.महादेव गव्हाणे (प्राचार्य राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूर) हे म्हणाले,”पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी तत्कालीन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. कारण शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखले होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती. मी त्यामुळेच शिक्षण घेऊन शकलो. गुरुजींचे शैक्षणिक क्षेत्रातील हे भरीव कार्य दिशादर्शक आहे,आज विद्यार्थ्यानी शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करून प्रगती करणे, ही गरजचे आहे.मला दिलेल्या पुरस्काराच्या पाच हजाराच्या रक्कमेत रुपये मी वीस हजाराची भर टाकतो आणि गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून द्यावी,असे सुचवले. यानिमित्ताने शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेले संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीने परिपूर्ण साकारलेले सा.साक्षी पावनज्योत पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी पुण्यस्मृतिदिन विशेषांकांचे आणि सोपान पवार यांच्या निबंध संकल्पना आणि स्वरूप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संजय भोसले, मुख्याध्यापक मातोळा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (गुरुजी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे ही बक्षीस वितरण आणि उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. दत्ता साकोळे यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,प्रा.आप्पासाहेब मिटकरी,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक प्रा.डॉ.कमलाकर जाधव,उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके,प्रा.डॉ.नामानंद साठे, प्रा.आर.जी.कारकर,डॉ.दीपक वाळके,प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ.मीनाक्षी जाधव, डॉ.पल्लवी उंदरे, प्रा.अनिल फाटक, प्रा.जयंत भोसले, प्रा. गोविंद काकडे,प्रा.एच.जे.काझी, प्रा.किरण बारकुल,प्रा.विलास आडसूळ, प्रा.विलास जगताप, प्रा.बापूराव शेळके, प्रा.गणेश आडे,प्रा.प्रताप शिंदे,संतोष मोरे, संदीप सूर्यवंशी आदी संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगरीतील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षणप्रेमी मंडळी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.वसंत मडके,हनुमंत जाधव, रमेश भालेकर,अरविंद शिंदे यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन डॉ. दादाराव गुंडरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.ईश्वर राठोड मानले.सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा