धाराशिव – आळणी येथील व्ही.पी.कॅम्पसमधील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘मेरी माटी,मेरा देश’ या उपक्रमाअंतर्गत अमृत कलश संकलन करून सेल्फी अपलोड करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी ‘मेरी माटी,मेरा देश’या भारत सरकारच्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली व या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ.शेख गाजी व डॉ.दिनकर झेंडे यांच्या हस्ते अमृत कलश पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा.केदार,प्रा.शेरखाने प्रा.सातपुते, प्रा.थोडसरे,प्रा.माने यांचे सहकार्य लाभले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी