August 9, 2025

श्री अंबाबाई देवी मंदिर सेवेकरी कराळे कुटुंबीय बांधतात विविध अलंकार महापूजा

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – नवरात्र महोत्सवाची सर्वत्र धामधूम असून मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने हा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त कळंब शहरातील श्री अंबाबाई देवी मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत.दर्शनासाठी दररोज महिला पुरुषांची मोठी गर्दी होत आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नवरात्र महोत्सवात श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात दररोज विविध रूपात अलंकार महापूजा मांडली जाते. त्याचप्रमाणे कळंब येथील देवी मंदिरातही देवीची अलंकार महापूजा बांधली जाते.महापूजा बांधण्याचा मान देवी मंदिर सेवेकरी कराळे कुटुंबियाकडे असून तीन पिढ्यापासून कराळे कुटुंबीय ही पूजा मनोभावे व परंपरेत खंडन न होऊ देता मोठ्या भक्ती भावाने करीत आहेत.दिनांक 19 ऑक्टोबर पंचमी निमित्त सेवेकरी शिवाजी कराळे यांनी श्रीक्षेत्र कोल्हापूर येथील अंबाबाई स्वरूपात देवीची महापूजा तसेच मुरली अलंकार महापूजा बांधली देवीचे विलोभनीय रूपाचे भक्तांना दर्शन झाले.अलंकार महापुजेत महालक्ष्मी अवतार,मुरली अलंकार,याचबरोबर रथालंकार, शेषशाही अलंकार, महिषासुरमर्दिनी व भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात येतात. कराळे कुटुंबियाकडे तीन पिढ्यापासून नवरात्र महोत्सवात देवीची अलंकार महापूजा बांधण्याचा मान आहे कराळे कुटुंबीयाचा पेंटिंग व्यवसायात नावलौकिक आहे. शंभर वर्षांपूर्वी शिवाजी कराळे यांचे आजोबा रंगनाथ कराळे यांनी ही पूजा बांधण्यास सुरू केले.यानंतर वडील शहाजी कराळे व आज शिवाजी कराळे ही पूजा मनोभावे व आपल्या कल्पक व कलात्मक पद्धतीने ही पूजा बांधतात. कराळे कुटुंबीय तीन पिढ्या ही सेवा भक्ती भावाने करीत असून या अलंकार महापूजा सजावटीची सामग्री व साहित्य ते स्वतःच्या खर्चातून करतात .

error: Content is protected !!