कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ९२ वी जयंती वाचन प्रेरणा दिन साजरी केली जाते. यावेळी प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दोन दिवसीय भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याचे उद्घाटन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.संजय कांबळे आणि प्राचार्य डॉ.एस.व्ही.पवार , उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान ,पंडीत पवार यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने मराठी विभागातील प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी महात्मा फुले यांच्यावरील संपादित केलेला क्रांतिरत्न हा महाग्रंथ तर डॉ.मीनाक्षी भवर यांनी संशोधनपर प्रबंध ग्रंथालयास भेट दिला. यावेळी यानिमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी प्राध्यापकांसाठी दोन दिवसीय भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी सा.साक्षी पावनज्योतचे उपसंपादक डॉ.के.डी.जाधव, प्रा. डॉ.एन.जी.साठे, डॉ.दादाराव गुंडरे, डॉ.संजय सावंत, डॉ.एन.एम.अदाटे, डॉ.हरिभाऊ पावडे , प्रा.डॉ.एम.बी.जाधव, डॉ. ईश्वर राठोड, डॉ.डी.एन. चिंते, डॉ. जयवंत ढोले, प्रा.राम दळवी, प्रा. घाटपारडे, डॉ. व्ही. टी.सरवदे, डॉ.पल्लवी उंदरे, प्रा.डॉ.अर्चना मुखेडकर , ग्रंथपाल प्रा.ए. एस. फाटक, सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक तथा स.ग्रंथपाल अरविंद शिंदे,अनुप पाटील,अंकुश लोकरे ,भारत शेळके, संगीता रूमने ,राजश्री भारती,सुनंदा झांबरे,दत्तात्रय गावडे , संदिप सूर्यवंशी, ग्रंथालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात