धाराशिव (जिमाका) – शिक्षणाची विविध क्षेत्रातील दालने खुली असल्याने युवावर्ग विविध क्षेत्रात आपले करिअर करताना दिसत आहे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दरवर्षी मोठ्या संख्येने युवावर्ग नोकरी आणि स्वावलंबनाच्या दृष्टीने व्यवसायाच्या शोधात बाहेर पडताना दिसत आहे. बहुतांश युवावर्गाला व्यवसाय करण्याचा तसेच नोकरी संबंधित अनुभवाचा अभावाला सामोरे जावे लागत असतांना मात्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार युवा वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यास लाभदायक ठरली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत 3214 उमेदवारांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली असून त्यांना रुजू आदेश दिल्याने ते रुजू देखील झाले आहेत.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 9 जुलै 2024 च्या शासन निर्णयाद्वारे युवावर्गाला शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024 -25 या वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अहर्ताप्रमाणे 12 वी पास असलेल्यांसाठी 6 हजार रुपये, आयटीआय /पदविका शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना 8 हजार रुपये आणि पदवी/पदव्युत्तर पदवी घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये शासनाकडून विद्या वेतन त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारासाठी शासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील 5564 तसेच खाजगी आस्थापनेवरील 457 अशी एकूण 6022 पदे उपलब्ध करून दिली आहे.आतापर्यंत प्रत्यक्ष 3214 शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांना शासकीय व खाजगी आस्थापनांनी रुजू आदेश दिले असून प्रशिक्षणार्थी संबंधित विभागाच्या आस्थापनेवर कामावर रुजू झाले आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरी यांनी प्रशंसा पत्राद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य