कळंब – विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेत डॉ.ए .पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .ही स्पर्धा अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा कळंब व कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली.
. या स्पर्धेचे आयोजन, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील ,मराठी विभाग प्रमुख ,साने गुरुजी कथामाला शाखा कळंबअध्यक्ष सोपान पवार यांनी केले होते. स्पर्धा घेण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून वाचनाची, लेखनाची सवय लागावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपले हस्ताक्षर सुंदर, वळणदार काढावे, सुंदर हस्ताक्षर हे विद्यार्थ्यांचे भूषण आहे याविषयी विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले . या स्पर्धा . अ गट पाचवी ते सातवी या गटातील विद्यार्थी 290 सहभाग नोंदविला तर ब गट आठवी ते दहावी या गटातील विद्यार्थी 360 विद्यार्थिनी सहभाग घेतला. दोन्ही गटातील एकूण 650 विद्यार्थ्यांनी या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही गटातील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय ,तृतीय, क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे . ही स्पर्धा घेण्यासाठी कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे, साने गुरुजी कथामाला अध्यक्ष सोपान पवार विक्रम मयाचारी, आप्पासाहेब वाघमोडे ,आनंद रामटेके विनोद सागर, शुभम जगताप आदी शिक्षकांनी पुढाकार घेतला
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट