August 9, 2025

कळंब येथे मोफत कॅन्सर शिबीर

  • कळंब – कै.सौ.विजयाताई रामकृष्ण लोंढे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधुन रोटरी क्लब कळंब, ईनरव्हील क्लब आणि विजया नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे पर्यंत उपजिल्हा रूग्णालय ( सरकारी दवाखाना) कळंब येथे मोफत कॅन्सर शिबीर आयोजित केले आहे. यासाठी बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलचे तज्ञ तपासणी करणार आहेत. यामध्ये कॅन्सर संदर्भात विविध चाचण्या/ टेस्ट विनामूल्य केल्या जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
    यावेळी कॅन्सर विषयक पोस्टर्स प्रदर्शनी भरवण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी/ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे शिबीर संयोजक डॉ. रामकृष्ण लोंढे,रोटरी अध्यक्ष रवि नारकर, सचिव डॉ.साजेद चाऊस, ईनरव्हील अध्यक्षा डॉ. आकांक्षा पाटील, सचिव जेमिनी भिंगारे यांच्या तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!