August 9, 2025

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे चौक सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

  • कळंब – साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कळंब शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि चौक सुशोभीकरणाचा शुभारंभ केला.
    चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे १० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.लवकरच कळंबच्या सौदर्यांत भर घालण्यासाठी सुसज्ज आणि आकर्षक असा चौक पूर्ण होईल.यावेळी उपस्थित कळंब-धाराशिव विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित खलसे,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष रोहित कसबे,उपाध्यक्ष अविनाश वैरागी, क्रम कमिटीचे सचिव प्रसिद्धी प्रमुख उमेश देडे,लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र खजिनदार सागर कसबे,विकास गायकवाड सर्व महिला व समाजातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!