August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शन आणि वृक्षारोपण

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींची जयंती महाविद्यालय आणि ट्रस्टच्या वतीने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विद्याभवन हायस्कूल येथे गुरूजींच्या समाधीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर परिसर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर क्रीडा संकुल,डिकसळ येथे वृक्षारोपण ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डाॅ.अशोकराव मोहेकर, कोषाध्यक्ष डॉ.अंकुशराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
  • यावेळी संचालक वसंतराव मडके,प्राचार्य डॉ. सुनिल पवार, उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य प्रा.आप्पासाहेब मिटकरी, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके, डॉ.एस.एम. कांबळे तसेच अधीक्षक हनुमंत जाधव, महाविद्यालयातील प्राध्यापक, एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी डॉ.महाजन, डॉ.ताटीपामुल, डॉ.मीनाक्षी जाधव,एन.सी.सी चे लेफ्टनंट पावडे, प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ.साठे, डॉ.राठोड, डॉ.भोसले, डॉ. सावंत,डॉ. ढोले डॉ.मस्के आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयांत यानिमित्ताने दोन दिवशीय भव्य ग्रंथ प्रदर्शन ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक व सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आहे.
  •  
    याप्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला साक्षी पावनज्योत या साप्ताहिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्य संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत,हभप महादेव महाराज आडसुळ,उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!