- धाराशिव (जिमाका) – राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 ते 28 जुलै-2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूचा समावेश या सप्ताहात करण्यात येणार आहे.
22 जुलै-अध्ययन अध्यापन साहित्य दिवस,23 जुलै-मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस,24 जुलै-क्रीडा दिवस,25 जुलै-सांस्कृतिक दिवस, 26 जुलै-कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस,27 जुलै-मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको-कल्ब उपक्रम/शालेय पोषण दिवस व 28 जुलै समुदाय सहभाग दिवस असे उपक्रम या शिक्षण सप्ताहादरम्यान राबविण्यात येणार आहे.
- हा सप्ताह विद्यार्थी,शिक्षक,धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपशिक्षणधिकारी (योजना) गजानन वाघमारे यांनी दिली.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक