भैरवनाथ खाजगी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
कळंब (बालाजी बारगुले ) – जीवनात प्रशिक्षणार्थींनी स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन,कौशल्य व सखोल ज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन कळंब येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य केशव पवार यांनी केले. ते धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलांतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या २०२२-२४ मधील प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ व करियर मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सतिश मातने होते. याप्रसंगी महावितरणचे इंजि.परमेश्वर कुटे, साम मराठी वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी सुरवसे,लोकशाही वहिनीचे जिल्हा प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी,शासकीय औद्योगिक संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक रविचंद्र जगदाळे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी आयटीआय मधील गुणवंत व आदर्श प्रशिक्षणार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.
द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी गिरीधर कवडे,अमर काळे,सुप्रिया चव्हाण,प्रितम हिंगे,सुमित खंडागळे,श्रीकांत धाकतोडे,धीरज भारती व अनिकेत खांबे यांनी मनोगत व्यक्त करत गेल्या दोन वर्षातील आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक अविनाश म्हेत्रे,प्रास्ताविक निदेशक सचिन राऊत तर आभार निदेशक राजकुमार शिंदे यांनी केले.
याप्रसंगी प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी चोंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड,विनोद कसबे,सोनाली ढमाले आदींची उपस्थिती होती.
* या शैक्षणिक संकुलात मी शिकलो आणि त्याच विद्यालयात मला प्रमुख पाहुणा म्हणून भाषण करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो. त्यासोबतच येथे अध्यापक विद्यालयात शिक्षण घेत असताना लागलेली कडक शिस्त त्याचमुळे मी घडलो आहे. मी जरी शिक्षकी पेशाचे शिक्षण पूर्ण केले असले तरी देखील आज पत्रकारितेमध्ये मी समाधानी आहे. — बालाजी सुरवसे जिल्हा प्रतिनिधी साम वहिनी
* ध्येय डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केल्यास यश आपोआपच मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ घेतलेल्या शिक्षणातच न रमता भविष्यात ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे त्याचं ज्ञान व माहिती घेतली तर निश्चितपणाने तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होतो.मी देखील पॉलिटेक्निक करून आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले