धाराशिव – येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय खोंदला या शाळेतील यश धम्मपाल वाघमारे यांनी भालाफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला व अथर्व दामाजी लांडगे यांनी तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धे करता निवड झाली आहे . तसेच कु. राधा लालासाहेब शिंदे या विद्यार्थिनीने तिहेरी उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका तथा क्रीडा शिक्षिका श्रीम.धाबेकर एस .जे.यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी विद्यार्थी, मुख्याध्यापिका श्रीम. धाबेकर एस. जे. सहशिक्षक भोंडवे एम .डी.,तावसे डी.जी, राऊत डी ए. व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट