February 11, 2026

कळंब पोलीसांचे शांततेचे आवाहन

  • कळंब – सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने दिनांक १९ जुलै २०२४ रोजी कळंब शहर बंद करण्याचे आवाहन केल्याने दि.१८ जुलै २०२४ रोजी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान पोलीस स्टेशन कळंब येथे संजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग कळंब रवी सानप, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली सकल मुस्लिम समाज बांधव, प्रतिष्ठित नागरिक ,शांतता कमिटी सदस्य, पत्रकार बांधव, मौलाना, व्यापारी बांधव यांची बैठक घेऊन, त्यांना कळंब बंदच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले, सदर मीटिंग करिता याहीया मौलाना, तारेख मिर्झा, मुस्ताक कुरेशी, इम्रान मुल्ला, आकीब पटेल, समीर सय्यद, ॲड.शकुंतला फाटक, तसेच पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना तरुणांनी कोणत्याही प्रकारचे गैर कृती करू नये, जबरदस्तीने कोणत्याही व्यापाऱ्याची दुकान बंद करू नये, कळंब शहर शांतता प्रिय असून या शहराची परंपरा आबादीत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. कोठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
    तसेच सर्व सुजाण नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले की, कोणीही सोशल मीडियाच्या आधारे समाजा समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून कोणाच्याही भावना दुखावतील असे कृत्य करू नये, कळंब शहरांमध्ये सामाजिक ,धार्मिक सलोखा असून कळंब शहराची महाराष्ट्रामध्ये आगळीवेगळी परंपरा आहे.कळंब शहर व आपला तालुका हा शांतता प्रिय असून, याची शांतता भंग होता कामा नये.करिता आपण सर्व बांधवांनी शांतता राखावी.शांतता प्रिय जनतेस व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.पोलीस प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे,आपला तालुका शांतता प्रिय आहे हे सर्वांना दाखवून द्यावे. कोणीही व्हाट्सअप, फेसबुक, टेलिग्राम यासारख्या सोशल मीडियाचा वापर करून धार्मिक तेड निर्माण नाहीत याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व समाज बांधवांनी कुठेही अनुचित प्रकार होणार नाही व होऊ देणार नाही याबाबत आश्वासन दिले.
error: Content is protected !!