कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल,तांदुळवाडी,कळंब येथे दि.१७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात साजरा. कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल, तांदुळवाडी,कळंब, जि. धाराशिव येथे आषाढी एकादशीनिमित्त ‘वारकरी दिंडी सोहळा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवि नरहिरे,सौ.आशा नरहिरे तसेच मुख्याध्यापक संतोष आळंदकर व उपमुख्याध्यापक विवेक अष्टेकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नजमून अजमेर शेख व त्यांचा परिवार उपस्थित होता. गेल्या वीस वर्षापासून खेर्डा ता.कळंब या गावी नजमून शेख या आषाढी दिंडीसाठी अन्नदान करत असून खेर्डा या गावामध्ये सप्ताह बसवण्याची सुरुवात देखील प्रथम त्यांनीच केली आहे. या सप्ताहात त्यांची पहिली पंगत असते.तसेच त्या अंगणवाडीच्या आशा कार्यकर्ती असून एसबी.आय. च्या विमा एजंट म्हणून देखील काम करतात. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्यामुळे शाळेतर्फे त्यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये चिमुकल्यांची वारी दिंडी काढण्यात आली. सीनियर केजी, जुनिअर केजी, पहिली तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायावर आधारित भारदार नृत्य सादर करून संस्कृतीची जोपासना केली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना बावीकर यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक विवेक अष्टेकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक-शिक्षिका वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवि नरहिरे व सौ. आशा नरहिरे यांनी या बालकलाकारांच्या आनंदात स्वतः सहभागी होऊन दिंडी सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला.
More Stories
शहरात श्री क्षेत्र गजानन महाराज पालखीचे आगमन व जल्लोषात स्वागत
मोहेकर महाविद्यालयांमध्ये ऑलिंपिक डे साजरा
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा