धाराशिव (जिमाका) – वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे विलंब शुल्क प्रतिदिन 50 रुपये आकारण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती.विलंब शुल्क माफ करणे/ विलंब शुल्काच्या आकारणीमधुन सुट देण्याबाबत ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडुन शासनाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन मुख्यमंत्री यांनी सदर प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन प्रभारी मंत्री (परिवहन), यांनी 11 जुलै 2024 रोजी विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.सर्व परिवहन वाहनांने योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन 50 रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तरी सर्व वाहन धारकांनी यांची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरणासाठी सादर करावीत.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी