August 9, 2025

छत्रपती संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने
    कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ जुलै २०२४ रोजी छत्रपती संभाजी विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
    विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल शिंदे,डॉ.स्नेहल मोहोळकर, श्रीमती बाबर औषध निर्माण अधिकारी,सुकेशनी लोंढे आरोग्यसेविका या सर्वांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.काहींना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले.
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,धनंजय डोळस, सूर्यकांत लोहार,अशोक सावंत, श्रीकांत तांबारे,पृथ्वीराज लोमटे, उस्मान शेख यावेळी उपस्थित होते.
error: Content is protected !!