कळंब – येथील फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर ला जाणाऱ्या पायी यात्रेकरू साठी नाष्टा-फराळ व वैद्यकीय मोफत सेवा बार्शी रोड लगत राधेश्याम मंगल कार्यालय येथे दि ५ जुलै २०२४ ते १२ जुलै २०२४ पहाटे ५ वाजल्यापासून ते सकाळी ९ वाजे पर्यंत चे दरम्यान ठेवलेली आहे. यासाठी आदल्या रात्री जेथे जेथे दिंड्या मुक्कामी असतात तेथे तेथे जाऊन संघटनेच्या वतीने यात्रेकरूंना निमंत्रण देऊन संपर्क क्रमांक देण्यात येतो. ठिकाण व वेळ सांगीतली जाते. यात्रेकरूंना नाष्टा- फराळ दिला जातो. गरजेनुसार वॉशरूम ची सोय उपलब्ध करुन दिली जाते. गरजूंना मोफत वैद्यकीय औषधोपचार करून सोबत औषधे दिली जातात. गरजेप्रमाणे आंबुलंन्स ची मोफत सेवा दिली जाते. या साठी संघटनेचे पदाधिकारी, शितल कवडे, गोपाळ उबाळे, परमेश्वर मोरे,डॉ.अभिजित लोंढे, बजरंग घुले,डॉ.भगवंत जाधवर, डॉ.सुधीर आवटे,आश्रुबा कसपटे, शशिकांत बारटक्के, दत्ता राखुंडे, बाबासाहेब पवार, उमाकांत बोंदर, डॉ.सुशिल ढेंगळे, गोविंद खंडेलवाल, गोविंद रणदिवे, राजाभाऊ नागटिळक. आय एम ए चे डॉ रामकृष्ण लोंढे, डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ.शितल कुंकूलोळ, डॉ.दिनकर मुळे आदी परिश्रम घेत आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी