धाराशिव – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात शुक्रवार दिनांक 21 जुन 2024 रोजी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. डाॅ. मेघश्याम पाटिल यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले. सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपकुलसचिव भगवान फड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. राहुल खोब्रागडे, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डाॅ. जितेंद्र कुलकर्णी, वरिष्ठ सहाय्यक चंद्रकांत आनंदगावकर, ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, सिद्धेश्वर नेटके, हेमंत रसाळ, सचिन रसाळ, कर्मचारी इ. उपस्थित होते.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान