कळंब (अविनाश सावंत) – तालुक्यातील गोविंदपूर येथे सकल ओबीसी महासंघाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवत १९ जून २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा म्हणून शंकर कराड व नानासाहेब मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाचा शुभारंभ झाला. त्यांच्यासोबत संजय कोळी,सावता माळी,कांचन मुंडे,अश्रुबा मुंडे,दिलीप गर्जे,ज्ञानेश्वर सावत,संजय नागरगोजे,रामभाऊ सौदागर,विठ्ठल कोटे,बालाजी माळी, किशोर खोडे,बबलू मुंडे,मेघराज मुंडे,विष्णू सौदागर,रामदास मुंडे,बाळासाहेब मुंडे,दिपक सावंत आणि गोविंदपूर येथील ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे.सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाच्या वतीने ओबीसी आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या वेठीस धरून व दबाव तंत्राचा वापर करत ओबीसींमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे ओबीसी महासंघाने शासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे की नाती-गोती शब्दात बदल करण्यात येऊ नये.
सतीश वैद्य – यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “आम्ही ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणार आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील. शासनाने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडू नये आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये.
शंकर कराड यांनी सांगितले की, “ही लढाई केवळ आरक्षणासाठी नाही, तर आमच्या समाजाच्या अस्तित्वासाठी आहे. शासनाने तात्काळ आमच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षणावर कोणताही घाला घालू नये.”
उपोषणाच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला. गोविंदपूरचे ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन आपल्या ओबीसी बांधवांसोबत एकजूट दाखवली. या उपोषणाची माहिती मिळाल्यानंतर इतर तालुक्यांमधूनही ओबीसी समाजातील लोकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.
सकल ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले असून, शासनाने यावर लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सुरू झालेल्या या उपोषणाची पुढील दिशा काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर