March 27, 2026

पत्रकारांच्या १० वी व १२ वी गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा

  • धाराशिव – धाराशिव तालुक्यातील पत्रकारांच्या १० व १२ वी नीट व जेईई उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुक्याच्यावतीने २० जून रोजी करण्यात येणार आहे.
    पत्रकार हा समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांचे आपल्या लेखणीतून कौतुक करतात. मात्र पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा ते सत्कार करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात गुरुवार दिनांक 20 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धाराशिव तहसीलच्या तहसिलदार डॉ. मृणाल जाधव या भूषविणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून धनश्री शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी दत्ता लांडगे व प्रा. रवी सुरवसे हे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने हा पत्रकारांच्या पाल्यांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला असल्यामुळे जास्तीत जास्त पत्रकारांनी आपल्या पाल्यांसह सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन व्हॉईस मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
error: Content is protected !!