धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.15 जुन रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 316 कारवाया करुन 2,43,850 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि 15.06.2024 रोजी 15.20 वा. सु. तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत साठे चौक तुळजापूर येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राहुल छगन क्षिरसागर वय 34 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.20 वा. सु. साठे चौक तुळजापूर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,040 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि 15.06.2024 रोजी 19.10 वा. सु. उमरगा पोलीस ठाणे हद्दीत अंबाबाई मंदीराजवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-ज्ञानेश्वर राम जमादार, वय 32 वर्षे, रा. आष्टा ज. ता. उमरगा जि. धाराशिव हे 19.10 वा. सु. अंबाबाई मंदीराजवळ मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीसांनी दि 15.06.2024 रोजी 17.50 वा. सु. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत हॉटेल माउली समोर पत्रयाचे शेडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-नितीन आत्माराम तांबे, वय 40 वर्षे, रा. बावी ता. जि. धाराशिव हे 17.50 वा. सु. हॉटेल माउलीचे समोर पत्रयाचे शेडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 685 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराश्वि ग्रामीण पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
शिराढोण पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) इम्रान खॉ इकबालखॉ पठाण, वय 29 वर्षे, रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.06.2024 रोजी 21.00 ते 22.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 6458 ही शिराढोण टीपी येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अतुल गोपाळराव मुगळे, वय 32 वर्षे, रा. शिंदे गल्ली उमरगा ता.उमरगा जि.धाराशिव, 2) यशवंत विनायक मोरे, वय 34 वर्षे, रा. आरोग्यनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.15.06.2024 रोजी 23.30 ते 00.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 4845 व ॲटो रिक्षा क्र एमएच 13 जे 8361 हे हॉटेल सोनाई टी पी सोलापूर ते हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) महादेव प्रभाकर वडणो, वय 42 वर्षे, रा. माळुंब्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.06.2024 रोजी 11.10 वा.सु. सौरउर्जा प्लॅटच्या समोर दहीवडी शिवार मार्डी ते काटी रोडवर छोटा हत्ती क्र एमएच 12 एफडी 1253 वाहनात गोवंशीय जनावरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. व सदर जणावरे शिवनंदी गोशाळा सुरतगाव येथे जमा केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्रणी संरक्षण अधिनियम कलम 5(बी), प्राण्याचा छळ प्रतिबंध कायदा कलम 11(1)(के) मोवाका कलम 83, 177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा”.
स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने : आरोपी नामे- 1)किसन नागनाथ कठारे, वय 32 वर्षे, न्हावी गल्ली महादेव गल्ली पाठीमागे औसा ता. औसा जि. जातुर ह.मु. राजे लॉज शिवार काक्रंबा, 2) अविनाश दिनकर माळी, वय 24 वर्षे, रा. पांढरे वस्ती नागरसोगा ता. औसा ह.मु. राजे लॉज काक्रंबा शिवार ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.14.06.2024 रोजी 17.15 वा सु काक्रंबा शिवारातील श्री.राजे लॉजवरती येथे एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- महेश संतोष काटवटे, वय 25 वर्षे, रा. विरहाणुमंत वाडी लातुर ता. जि. लातुर ह.मु. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आरोपी नामे- बालाजी सोनटक्के रा. विरहाणुमंत वाडी लातुर ता.जि. लातुर यांनी दि. 27.05.2024 रोजी 12.00 ते दि. 28.05.2024 रोजी 00.30 वा. सु महेश काटवटे यांच्या राहते घरुन अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व मोबाईल फोन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश काटवटे यांनी दि.15.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-श्रीरंग कल्लाप्पा चव्हाण, रा. राजेश नगर ढोकी, माया छगन काळे, छगन सरदार काळे, दोघे रा जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 15.06.2024 रोजी 14.00 वा. सु. ढोकी पेट्रोलपंप चौक येथे फिर्यादी नामे-रंगा बिरु शिंदे, वय 55 वर्षे, रा. कावळेवाडी शिवार ता. जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रंगा शिंदे दि.15.06.2024 रोजी दिलेल्या पथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 16 छापे.”
मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.15.06.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 16 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 623 लि. गावठी दारु,सिंधी ताडी अम्ली द्रव 386 लि. व देशी- विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 85,720 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 16 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1) कळंब पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-रेश्मा अमोल पवार, वय 30 वर्षे, रा. पु.सावरगाव ता. कळंब जि. धाराशिव या 03.15 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 8,000 किंमतीची 100 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरेापी नामे-चंद्या अनंतय्या कलाल, वय 46 वर्षे, रा. नरोना ता. आळंद जि. कलबुर्गी ह.मु. डिग्गी रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. अविनाश सुर्यवंशी यांचे शेतासमोर एकोंडी शिवार येथे अंदाजे 16,300 ₹किंमतीची 200 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे- प्रकाश माणिक माशाळे, वय 58 वर्षे, रा.गुंजोटीवाउी ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.45 वा. सु. प्रकाश माणिक माशाचे यांचे पत्रयाचे शेडसमोर अंदाजे 4,100 किंमतीची 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
3) मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 छापे टाकले. आरोपी नामे- मलय्य नागय्या गुत्तेदार, वय 49 रा. बाजार पटांगण भवानी चौक सोलापूर, ह.मु. येणेगुर हे 17.30 वा. सु. साठेनगर येणेगुर येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 3,600 किंमतीची 36 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे- मालनाबाई पोपट काबंळे, वय 67 वर्षे, रा.सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव या 19.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर मोकळ्या जागेत अंदाजे 2,360 किंमतीची 18 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4)धाराशिव शहर पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- फुलचंद तुमराज देवकर, वय 23 वर्षे, रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक वडार गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.10 वा. सु. एमएसईबी ऑफीसचे पाठीमागे इंदीरानगर येथे अंदाजे 6,960 ₹ किंमतीची 116 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- ईश्वर गरीबदास इंगळे, वय 47 वर्षे, रा. अजिंठा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. आठवडी बाजार जाणारे रोडलगत अंदाजे 7,080 ₹ किंमतीची 118 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. तर आरोपी नामे-लहु बापु काळे, वय 38 वर्षे, रा. पारधी पिडी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे 21.30 वा. सु. केशव महादेव आरसुल यांचे मंगलकार्यालयाचे बांधकामाजवळ अंदाजे 2,520 ₹ किंमतीची 28 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6)ढोकी पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. तर आरोपी नामे-राजा शंकर पवार, वय 50 वर्षे, रा. पारधीपीडी तेर ता. जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. आपल्या राहत्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 1,200 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
7)धाराशिव ग्रामीण पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. तर आरोपी नामे-राजेंद्र कृष्णाथ दिंडोळे, वय 48 वर्षे, रा. चिलवडी ता. जि. धाराशिव हे 17.15 वा. सु. चिलवडी झोपडपट्टी येथे अंदाजे 600 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
8)वाशी पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. तर आरोपी नामे-जनाबाई बालाजी उर्फ बाळू शिंदे, वय 40 वर्षे, रा. बोरगाव धं ता. कळंब जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घराच्या बाजूला अंदाजे 1,540 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
9)भुम पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे-मच्छिंद्र बप्पा काळे, वय 32 वर्षे, रा. भवानवाडी सु ता. भुम जि. धाराशिव हे 18.50 वा. सु. ईराचीवाडी फाटा जवळ पत्रयाचे शेडचे बाजूला अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
10)नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे-मोहन शिवाजी पवार, वय 42 वर्षे, रा. रामतिर्थ तांडा ह.मु. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
11)बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे-रंजना अरुण शिंदे, वय 40 वर्षे, रा. पारधीवस्ती तुळजापूर खुर्द ह.मु. केशेगाव साखर कारखाना जवळ जि. धाराशिव या 18.00 वा. सु. केशेगाव कारखान्या जवळ अंदाजे 15,000 ₹ किंमतीची 150 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले.
12)स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे-राजेश बापु काळे, वय 50 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 8,000 ₹ किंमतीची 80 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
13)लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 छापा टाकला. आरोपी नामे-बालाजी रुद्र भारती, वय 65 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव 18.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर कानेगाव येथे अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश