कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब येथील विद्याभवन हायस्कूलातील शिक्षिका श्रीमती ए.डी.राऊत यांची संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या मध्यवर्ती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचा संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे आश्रम संचालिका सरस्वती अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात फेटा ,शाल व बुके देऊ न धाराशिव जिल्हा वारकरी महिला साहित्य परिषद अध्यक्षा ह.भ.प .सुनीता देवी महाराज अडसूळ ,धनश्रीताई कवडे ,इंदुताई माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्रीमती ए.डी. राऊत यांनी संत चोखामेळा अध्यासन केंद्र संत चोखामेळा महाराज यांचे साहित्य, जीवन कार्य व संबंधित संशोधन ,प्रचार व प्रसार जागृतीचे कार्यकर्ते करते या मंडळाच्या अध्यक्षा उल्का चंदनशिवे आहेत.माझ्या कार्याची दखल घेऊन अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिव सचिन पाटील यांनी काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी भजनी महिला मंडळाच्या विमल ताई मडके, अर्चनाताई मुंडे,मंजूताई पवार,आशा देवकर,जयश्री मडके यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ..प.महादेव महाराज अडसूळ यांनीही या निवडीबद्दल सत्कार केला.याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे , प्रा.सुरवसे, प्राचार्य महादेव गपाट ,माधवसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते बंडू आबा ताटे ,रमेश शिंदे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पवार यांनी केले.
More Stories
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू