June 24, 2025

एकल महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप

  • कळंब – तालुक्यातील हसेगाव केज येथील
    पर्याय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि
    फिनोलेक्स पाईप व मुकुल माधव फाउंडेशन पुणे
    यांच्या मदतीने धाराशिव जिल्ह्यातील 425 एकल
    महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामात पेरणीसाठी
    सोयाबीन व तुर बियाणाचे वाटप करण्यात आले सोबत महिलांना साडीची देखील भेट देण्यात आली.
    या बियानांचे वाटप पर्याय संस्थेचे कार्यवाहक
    विश्वनाथ तोडकर, मुकुल माधव फाउंडेशनचे बबलू मोकळे,
    श्री ठाकरे साहेब, इफकोच्या संचालक डॉ. वर्षाताई कस्तुरकर, कस्तुरकर,
    अनिक फायनान्स कंपनीचे मोहीम प्रमुख विलास गोडगे,
    पर्यायच्या प्रकल्प समन्वयक तेजश्री भालेराव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.
    कळंब,वाशी,भूम,परांडा या तालुक्यातील 425
    विधवा,परितक्ता,एकल महिलांना सोयाबीन आणि
    उडीद बियाणांचे वाटप दि.14 आणि 15 जून रोजी अनुक्रमे कळंब व भुम तालुक्यांमध्ये
    करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम
    अखंडपने राबवला जात असून आतापर्यंत एक
    कोटी रुपयाच्या बियाणांचे वाटप केले आहे.
  • गेल्या तीस वर्षापासून पर्याय संस्था वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने दुष्काळ निर्मूलन, एकल महिलांचे संघटन आणि पुनर्वसन, अनिकच्या माध्यमातून महिला बचत
    गट संघटन, ग्रामीण महिलांचे आर्थिक, सामाजिक
    सक्षमीकरण, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील
    महिलांना कमी व्याजदराचे अर्थ सहाय्य यासारखे
    विविध उपक्रम राबवत आहे. बियाणे वाटपाचा
    कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्याय आणि अनिक
    परिवाराचे अनिताताई तोडकर, सुनंदा खराटे, ऋषीकेशभैया तोडकर,अतुल चिलवंत,भुम व कळंब विभाग प्रतिनिधी आदी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
error: Content is protected !!