कळंब – नवगातांचे शाळेतील पहिले ठेवलेले पावलाचे ठसे घेऊन कायमस्वरूपी लक्षात राहील अशा आठवणी साठवणीसाठी शाळांनी उपक्रम राबविले आहेत. शहरातील शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यानिकेतन मध्ये दि.१५ जून २०२४ रोजी नवागताचे स्वागत मुख्याध्यापक हरिश्चंद्र शेळके यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेमार्फत गणवेश, पुस्तके देण्यात आली शिवाय शाळेत पहिल्या दिवशी उपस्थतना खी वाटप करून पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी शाळेतील वर्गशिक्षिका संगीता धुमाळ,श्रीमती संगीता करपे,बबिता कदम,अलका मडके,मायदेवी संजेकर,वर्षा बन, अनिता याटे,सतीश बाच्छाव, दत्तात्रय तूपसमुद्रे,मंगेश यादव आदी शिक्षक शिक्षिका सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन