मुंबई – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.
या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवार, दि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
More Stories
महाराष्ट्रात गेमिंग व क्रिएटर इकॉनॉमीला चालना;डिजिटल पायाभूत सुविधांवर भर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“स्थगिती नसताना शेतकऱ्यांचे पैसे का अडवले?” – २०२० च्या पीकविम्यावर आमदार कैलास पाटील विधानसभेत आक्रमक
१७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा;शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी – कृषी विभागाचे आवाहन