धाराशिव (जिमाका ):-नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी दरमहा तालुकास्तरीय शिबीर कार्यालयाचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.माहे-ऑक्टोंबर-2023 या महिन्यात पुढील दिनांकास शिबीर आयोजित केली जाणार. उमरगा येथे दि.10,17,31 कळंब येथे दि.09,30 लोहारा येथे दि.20, भूम येथे दि.19 ऑक्टोंबर-2023, नळदुर्ग (तुळजापूर) येथे दि.11,25 परंडा येथे दि.12,26 वाशी दि.18 ऑक्टोंबर-2023 या दिनांकास शिबीर होणार आहेत. सर्व नागरिकांनी sarathi.parivahan.gov.in/sarathi या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने Appointment घेऊन कँपच्या दिवशी उपस्थित रहावे,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी