February 9, 2026

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण बीसीजी लसीकरण मोहीम

  • धाराशिव (जिमाका)- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण निश्चित केले आहे.क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून TB preventive therapy (TPT) क्षयरोग प्रतिबंधात्मक औषधी देण्यात येत आहे.तसेच ABCG मोहीम केंद्र शासनाच्या आदेशान्वये धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रौढ BCG लसीकरण करण्यात येणार आहे.
    प्रत्यक्ष अडल्ट बीसीजी लसीकरण मोहीम माहे मे,जून,जुलै या कालावधीत राबवायचे आहे.या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थी शोधण्याकरिता आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत 22 एप्रिल 2024 पासून ग्रामीण व शहरी भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे.तसेच या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे. तसेच सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार असून या मध्ये संशयीत क्षयरुग्ण शोधण्यात येणार आहेत.
    अडल्ट बीसीजी लसीकरणासाठी मागील पाच वर्षातील सर्व क्षयरुग्ण,मागील तीन वर्षातील क्षयरुग्णाचे सहवासीत,साठ वर्षावरील सर्व,मधुमेह रुग्ण,धुम्रपान करणारे,बॉडी मास इंडेक्स (BMI) 18 पेक्षा कमी वयाचे इत्यादी लाभार्थी पात्र आहेत. तर गरोदर माता /स्तनदा माता, सद्यस्थितीत क्षय रोगाचे उपचार घेत असलेले/ क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (TPT) घेत असलेले, एचआयव्ही/ कर्करोग्रस्त /अवयव प्रत्यारोहण झालेल्या व्यक्ती,गंभीर आजार / दुर्धर आजार असलेले व्यक्ती,मागील तीन महिन्यात रक्त चडवलेले व्यक्ती,बीसीजी अथवा इतर कोणत्याही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झालेल्या व्यक्ती, जोखीमयुक्त वर्तन असणाऱ्या व्यक्ती इत्यादी व्यक्ती या अडल्ट बीसीजी लसीकरणासाठी अपात्र आहेत.
    पात्र लाभार्थींचे मे महिन्यात प्रत्यक्ष लसीकरण होणार आहे.ह्या लसीकरण सर्व प्रशिक्षित लस टोचक (व्हॅसिनेटर) यांच्याद्वारे नियमित लसीकरण सत्राचे दिवस वगळून या लसीकरणाचे नियोजन होणार आहे. तसेच जून व जुलै महिन्यात वंचित लाभार्थ्यांना लसीकरण दिले जाणार आहे.
    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हास्तरीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.
    तरी घरोघरी येणाऱ्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे व जोखमीच्या गटातील 18 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडे पूर्व नोंदणी करून घ्यावी.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व जिल्हा परिषद आरोग्य विभाग धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!