February 9, 2026

शहिद दिनानिमित्त स्वच्छता अभियान व मतदार जागृती कार्यक्रम संपन्न

  • धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मुलींचे वसतिगृह परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना आणि कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शनिवार दिनांक ३०-३-२०२४ रोजी मतदार जागृती कार्यक्रम ” मेरा वोट देश के लिए” राबविण्यात आला. सदरील कार्यक्रम विद्यापीठ उप-परिसर संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून विद्यापीठ उप-परिसर येथील इंग्रजी विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे हे लाभले तर रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील हिंदी विभागातील डाॅ.के.एम. क्षीरसागर व राज्यशास्त्र विभागातील डाॅ.दत्तात्रय साखरे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले.
    डाॅ.के.एम.क्षीरसागर यांनी “निवडणूक, युवक आणि भूमिका” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न ठरता मतदान केले पाहिजे. सदसद्वविवेकबुद्धीने मतदान केले पाहिजे. विश्वासाने माणसे जोडली पाहिजेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, व न्याय या तत्वावर आधारित विकास झाला पाहिजे. नोकरीच्या संधी व्यापक प्रमाणात निर्माण करणारा विकासात्मक कार्यक्रम राबविला पाहिजे असे विचार डॉ.क्षीरसागर यांनी व्यक्त केले. डाॅ.दत्तात्रय साखरे यांनी मतदान प्रक्रियेविषयी सखोल विश्लेषण केले. प्रामाणिक, संवेदनशील, सांस्कृतिक व विकासाचा ध्यास असणारे प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. देशासमोरील गरिबी, बेरोजगारी, महागाई इ. प्रश्न सोडविणारे उमेदवार निवडून दिले पाहिजेत असे विचार त्यांनी व्यक्त केले. डाॅ. गोविंद कोकणे यांनी अध्यक्षीय समारोप केला. मतदारांनी उदासीन, बेफिकीर न राहता मतदान प्रक्रियेत उत्साहाने व विवेकपूर्ण सहभाग घेऊन लोकशाही सशक्त बनविली पाहिजे. राजकिय व्यवस्थेत प्रामाणिक, ध्येयनिष्ठ, देशभक्त, विद्वान लोकांनी सहभागी होऊन देशाचे भवितव्य उज्ज्वल केले पाहिजे. प्रामाणिक व्यवस्था सर्वच प्रश्न सोडविण्यास सक्षम असेल असे विचार डॉ. कोकणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघशाम पाटिल यांनी केले. सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. राहुल खोब्रागडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षणशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डाॅ. जितेंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले. अमन शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!