तलवारीच्या धारेवरती
पराक्रमाचे बोल बोलती
इतिहासातील अमर कहाणी
रणरागिणी झाशीची राणीस्वप्न पाहिले खुल्या लोचणी
स्वराज्य स्थापन करण्याचे
घडविले जिने वीर शिवबाला
मानाचा मुजरा राजमाता जिजाऊलाहाती घेऊन अक्षरलेखनी
दान दिलेस विद्येचे
नारी तू उद्धारली
ज्ञानज्योती सावित्रीआंबेडकरी लेखणीची धार
दीनदुबळ्यांसाठी झिजली फार
बलिदान,करुणा,प्रेम अपार
रमाईचे थोर उपकारअनाथांची माय होऊनी
लाखो मुले ओटी घेऊनी
संस्काराचे बीज रोवूनी
माय सिंधू गेली सोडूनीस्त्री जन्मा ही तुझी कहाणी
या सृष्टीची तूच जननी
कधी कर्तुत्व कधी गृहिणी
या संसारी तूच स्वामिनीशत शत नमन तुला मर्दिनी
शत शत नमन तुला मर्दिनीशब्दरचना-छाया फाटक तौर
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले