कळंब – शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दिनांक ०८ मार्च २०२४ रोजी पुष्पक पार्क,धाराशिव येथून आळणी फाटा, ढोकी येथे स्वागत होणार असून ते कळंबकडे प्रवास करणार असून कळंब येथील मार्केट यार्ड येथे ०८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सभा होणार आहे व त्यानंतर कळंबहून येरमाळा येथे स्वागत होणार असून कुसळंब, बार्शी बायपास मार्ग परंडा कडे प्रवास करणार आहेत. परंडा येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत होणार असून ते परंडयाहून सोनारी कडे प्रवास करणार आहेत. त्यानंतर अनाळा,बालबड मार्गे भूम कडे प्रवास करणार आहेत व भूम येथे दि. ०८ मार्च रोजी सायं. ०४.०० वा. नगर पालीकच्या समोर चौकात सभा होणार आहे व सभा संपल्यानंतर भुमहुन छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट कडे प्रवास करणार आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले