धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 188 कारवाया करुन 1,39,650 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)सुजित लहु गायकवाड, वय 32 वर्षे, रा. अंबेहोळ ता. जि. धाराशिव हे दि. 26.02.2024 रोजी 08.00 वा. सु. सुजित किराणा स्टोअर्सच्या बाजूला अंबेहोळ येथे अंदाजे 1,505 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 36 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-1)मंगलबाई राजेंद्र पवार, वय 40 वर्षे, रा. गावसुद ता. जि. धाराशिव या दि. 26.02.2024 रोजी 19.00 वा. सु. पारधी वस्तीवर गावसुद येथे अंदाजे 21,000 ₹ किमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव 350 लि. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
आनंदनगर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अनिल रामकृष्ण वाघमारे, वय 45 वर्षे, रा.समर्थ नगर ता. जि. धाराशिव हे दि. 26.02.2024 रोजी 15.50 वा. सु. पंचायत समिती धाराशिव च्या पाठीमागील रोडच्या कडेला मोकळ्या जागेत धाराशिव येथे अंदाजे 6,030 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
परंडा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)पिंटु विष्णु कोकाटे, वय 40 वर्षे, रा.कुंभेजा, ता. परंडा जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 15.10 वा. सु. कुंभेजा व भोंजा फाटा येथील चौकाच्या जवळ भोंजा गावात जाणाऱ्या उजव्या बाजूस एका पत्रयाचे शेडच्या आडोशाला अंदाजे 1,350 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे
भुम पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)नवनाथ दादाराव सातपुते, वय 30 वर्षे, रा. वाकवड, ता. भुम जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 16.00 वा. सु. वाकवड येथील खंडोबाच्या मंदीरासमोर आपल्या राहात्या समोर अंदाजे 5,320 ₹ किमतीच्या देशी विदेशी दारुच्या 76 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.26.02.2024 रोजी 19.20 ते 19.25 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत 2 येथे छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)दाउद कचरु पठाण, वय 28 रा. धारासुर मर्दीनी कमानी जवळ खाजानगर ता. जि. धाराशिव हे 19.20 वा. सु. इंदीरानगर येथील सांजा रोडला जाणारे गॅलक्सी पान शॉप चे पाठीमागे मोकळ्या जागेत धाराशिव येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 920 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.तर आरोपी नामे 2)मस्तान बाबु पठाण, वय 40 रा. दर्गा रोड वैराग नाका ता. जि. धाराशिव हे 19.25 वा. सु. विजय चौक येथील अबरार हॉटेलच्या बाजूला धाराशिव येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 720 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.26.02.2024 रोजी 15.30 वा. सु.बेंबळी पो. ठा. हद्दीत पाडोळी आ. ता. जि. धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)बापु अमृत ढाकरे, वय 46 वर्षे,हे 15.30 वा. सु. पाडोळी आ. ता. जि. धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,461 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अनंत भिमराव क्षिरसागर, वय 34 वर्षे, रा. काटगाव ता. जि. लातुर, 2) कुशाग्र युवराज सरवदे, वय 24 वर्षे, रा. बांगजी ता. औसा जि. लातुर हे दोघे दि.26.02.2024 रोजी 13.15 ते 13.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे पिकअप क्र एमएच 24 एयु 1892, ओमीनी कार क्र एमएच 24 एएफ 3915 हे तुळजापूर ते लातुर जाणारे रोडव्र भंडारी टि पाईंट जवळ, बेंबळी ते उजणी जाणारे रोडवर नांदुर्गा पाटी चौकात टी पाईट जवळ वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सिद्रमप्पा यशवंत शहाणे, वय 23 वर्षे, रा. बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.02.2024 रोजी 18.20 वा. सु. आपल्या ताब्यातील छोटा हत्ती क्र एमएच 25एजे 0339 हामुरुम ते आलुर जाणारे रोडवर बेळंब चौकात रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) प्रशांत शेषेराव सुरवसे, वय 28 रा.सुदंरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 22.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल केए 32 एस 257 ही मुरुम मोड येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अनिकेत राजेंद्र माटे, वय 25 रा.नागराळ ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 20.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 25 एयु 2540 ही लोहारा जेवळी रोडवर मोगा फाट्याजवळ रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) शिवानंद बाबुराव माळगे, वय 55 रा.मेनरोड लक्ष्मी चौक, नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे शिवशक्ती हॉटेल बसस्थानक समोर नळदुर्ग येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) राहुल विजय लगाडे, वय 28 रा. उंबरा ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. सर्कीट हाउस जवळ धाराशिव हे दि.26.02.2024 रोजी 19.45 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे एमआयडीसी अक्षय मेटल धाराशिव चोक येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे : सार्वजनिक ठिकाणी हॉटेल, हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणे, या व्यक्तींवर बेंबळी पोलीसांनी काल दि. 26.02.2024 रोजी 13.30 ते 15.20 वा. सु. एकुण 3 कारवाया केल्या. यात आरोपी नामे 1) समाधान नामदेव माने, वय 27 वर्षे, रा. विठ्ठलवाडी ता. जि. धाराशिव, 2)बालाजी विधुरत सोनटक्के, वय 45 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव, 3)सुनिल विठ्ठल बनकर, वय 28 वर्षे, रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव या तिघांनी बेंबळी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक,उमरेगव्हाण जाणारे रोडलगत व एनएच 361 हायवे रोडचे उत्तर बाजूस गोगाव पाटी येथे रोडलगत आपपल्या हॉटेलमध्ये गॅस शेगडीत निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करत असताना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 285, अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मारहाण.”
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)शामराव हरीभाउ पवार, रा. घारागाव तांडा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.25.02.2024 रोजी 21.30 वा. सु. आदित्य बार घारगाव ता. कळंब येथे फिर्यादी नामे-परमेश्वर मधुकर साहफंके, वय 47 वर्षे, रा.घारगाव ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपी म्हणाला की, तु झेंड्याच्या वेळेस लय पुढे पुढे करत होता, तु लय माजलास असे म्हणून शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे परमेश्वर साळुंके यांनी दि.26.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे : मयत नामे-1) धनंजय धोंडीराम बंडगर, वय 42 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.02.2024 रोजी 14.00 वा. सु. कळंब ते लातुर रोडवर शिराढोण शिवारात श्रावणी बार चे जवळून मोटरसाकल क्र एमएच 13 एएच 4160 वरुन जात होते. दरम्यान स्वराज 855 कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 2033 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून चालवून धनंजय बंडगर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात धनंजय बंडगर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाग्यश्री धनंजय बंडगर, वय 37 वर्षे, रा. खामसवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अवैध गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर तामलवाडी पोलीसांची कारवाई.”
दि.24.02.2024 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक मालवाहु ट्रक क्र एमएच 43 यु 1523 यामध्ये अवैध गुटखा वाहतुक करीत तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने जात आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून समोरुन येणारे ट्रक क्र एमएच 43 यु 1523 हा थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव समीर सरवर पाशा, वय 26 वर्षे, रा. दुबलगुंडी ता. हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक असे सागिंतले. त्यावर पथकाने सदर ट्रक व त्यातील मिळून आलेला 1) बादशहा कंपीनचा गुटखा एकुण 40 मोट्या गोण्या 15360 पॉकीटे अंदाजे 18,43,200 ₹ किंमतीचा माला सह ट्रक क्र एम.एच. 43 यु 1523 असा एकुण 28,43,200 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- समीर सरवर पाशा, वय 26 वर्षे, रा. दुबलगुंडी ता. हुमनाबाद जि. बिदर राज्य कर्नाटक यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे तामलवाडी येथे गुरनं 30/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह कलम 26(2)(i),26(2)(iv),27(3)(e), 30(2), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार हे करत आहे.
सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोहेकॉ, विक्रम सावंत, दिनकर तोगे पोलीस अंमलदार सुरज नरवडे, शिवाजी सिरसट, उमेश माने यांचे पथकाने केली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला