August 8, 2025

लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प- डॉ.प्रतापसिंह पाटील

  • धाराशिव (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये केवळ लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत मात्र प्रत्यक्षात यासाठी निधीची तरतूद कशी करणार हे सांगितलेले नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.
  • पुढे त्यांनी असे म्हटले आहे की,
    शेतकऱ्यांसाठी कोणतही विशेष पॅकेज किंवा घोषणा करण्यात आलेली नाही मात्र गुत्तेदार पोसण्यासाठी या सरकारने अनेक योजना आजच्या या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्या आहेत.विशेषतः धाराशिव जिल्ह्याबाबत बोलायचं असेल तर धाराशिव जिल्ह्यासाठी सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाच्या तरतुदी शिवाय या अर्थसंकल्पामध्ये फारस काही दिसून आलं नाही.धाराशिव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी निधीची तरतूद होईल अशी अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा फोल ठरली येणाऱ्या लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अंतरिम अर्थसंकल्प मांडलेला दिसून येतो. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा पाऊस पडलेला दिसून येतो.उद्योग,शेतकरी व युवकांसाठी या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला कर्जाशिवाय इतर काही मिळणार नाही असं मला वाटतं.
error: Content is protected !!