February 9, 2026

डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे यश

  • धाराशिव (जयनारायण दरक) –
    डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव येथे सातव्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
    या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विचार मंचावर श्रीमती अंजू शेंडे ( प्रमूख जिल्हा व सत्र न्यायाधीश, धाराशिव),नानासाहेब पाटील, प्राचार्य डॉ.व्ही.जी.शिंदे,ॲड. शरद जाधवर (शासकिय अभियोक्ता) उपस्थित होते.
    सदर स्पर्धेत राज्यभरातील विविध विधी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये वकिली व्यवसायाकरीता आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा विकास करणे व दैनंदिन न्यायालयीन प्रक्रियांची महिती देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सातव्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धा 2024 मध्ये डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव चा संघ विजयी झाला.या संघातील सहभागी विद्यार्थी कु.सूरज प्रधान,कुमारी ज्ञानेश्वरी जाधवर, कु.अतुल जानराव यांनी अभ्यासपूर्ण युक्तिवाद करत विजय मिळवला.
    स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे:
    1)विजेता संघ- सूरज प्रधान, ज्ञानेश्वरी जाधवर, अतुल जानराव
    (डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव),2)रनर उप-आदिती बिरादार, प्रसाद शेटे, तनया काळे,
    (दयानंद लॉ कॉलेज लातूर),
    3) सर्वोत्कृष्ट संशोधक – अतुल जानराव
    (डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव),
    4) सर्वोत्कृष्ट युक्तिवाद – आसिम शकील सय्यद
    (दयानंद लॉ कॉलेज सोलापूर),
    5) सर्वोत्कृष्ट मेमोरियल-(राजश्री शाहू कॉलेज बार्शी),
    6) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्वयंसेवक – आंचल जानराव, शिवानी ढवणे,
    7) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी समन्वयक – निखिल शेंडगे, सार्थक सुरवसे, प्र. प्राचार्य डॉ.व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ.संजय अंबेकर व सह समन्वयक प्रा.श्रियश मैंदरकर यांनी यशस्वी नियोजन केले.
    प्रसंगी श्रीमती अंजू शेंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मूट कोर्ट स्पर्धेचे महत्त्व समजून सांगताना वकीली व्यवसायातील नैतिकता आणि विविध अभ्यास पद्धतींचा अवलंब करून कायद्याचा अर्थ कशा प्रकारे लावला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर स्वतःशी व निसर्गाशी प्रामाणिक राहून अभ्यास केल्यास निश्चित यश संपादित करता येते. असे विचार व्यक्त केले.
    यावेळी प्र. प्राचार्य डॉ व्ही. जी. शिंदे यांनी मूट कोर्ट स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश, डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालययाची यशोगाथा या विषयी माहिती दिली.
    नानासाहेब पाटिल यांनी आदर्श समाज घडविण्यासाठी कायदेशीर शिक्षणाचे महत्त्व व उपयुक्तता या विषयी विचार व्यक्त केले.
    शासकिय अभियोक्ता ॲड.शरद जाधवर यांनी न्यायिक प्रकीया पार पाडताना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांचे कथन व उपस्थित विद्यार्थ्यांना वकीली व्यवसायातील विविध संधी या विषयी मार्गदर्शन केले.
    या वेळी वसंत यादव ( सेक्रेटरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव),व्ही.आर. दासरी (सह दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर), ॲड. सुधाकर मुंडे, ॲड. डोके, ॲड राघवेंद्र बोधले, ॲड. प्रसाद जोशी, ॲड. दत्तात्रय घोडके, ॲड. तेजश्री पाटील, ॲड.अर्चना ढोरणालिकर,ॲड.ओंकार राखेलकर,ॲड.ज्योती वाघे , ॲड. भाग्यश्री कदम आदी मान्यवरांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले.
    प्रसंगी डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. इक्बाल शाह, डॉ. पौर्णिमा तापडिया, प्रा.चंदणी घोगरे, प्रा.अजित शिंदे, प्रा.सोनाली पाटील, प्रा.कैलाश शिकारे, कार्यालयीन कर्मचारी संजय क्षीरसागर,संभाजी बागल, बशीर अत्तार,रोहित क्षीरसागर, आकाश कवडे,राहुल ओव्हाळ यांचे समवेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सूरज प्रधान, कु.दिलीप सलगर तर आभार प्रदर्शन कु. ज्ञानेश्वरी जाधवर व कु. नेहा यादव यांनी केले.
error: Content is protected !!