कळंब-शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे एन एम एम एस या परीक्षेत यश संपादन केले.विद्यालयातील एकूण 23 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक जाफर पठाण यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तांबोळी हुजेफ, राऊत शंतनू, थोरात पृथ्वीराज, इंगळे भावेश, जाधव कृष्णा, माने श्रावणी, रत्नपारखी प्रिया, चौरे दीपक, वाघमारे अभिनव, वाघमारे अभिराज, नलावडे गौरी, खापे प्रगती, कांबळे चेतन, वाघमारे कृष्णा, सावंत सार्थक, यादव सृष्टी, कुंभार सचिदानंद, शेख आरमान, गायकवाड संस्कृती, कुपकर रुद्रा, लाड आर्यन या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले. यांना मार्गदर्शक म्हणून प्रकाश पाळवदे, सचिन सलगर, सोमनाथ सावंत, अत्रिऋषी खोकले, दत्ता टारपे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर तोडकर यांनी केले यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट