कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होत असलेले सा.साक्षी पावनज्योतच्या शहरातील दत्त नगर व विद्याभवन हायस्कुलच्या प्रतिनिधी पदी विशाल पवार यांची दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्रबूध्द रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेचे अभ्यासू अध्यक्ष मा.सुभाष द.घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित होत असलेल्या सा.साक्षी पावनज्योतच्या दत्त नगर व विद्याभवन हायस्कुलच्या प्रतिनिधी पदी विशाल पवार यांची नियुक्तीचे ओळखपत्र ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक तथा मुख्याध्यापक विलास पवार यांच्या हस्ते देवून करण्यात आली. याप्रसंगी सहशिक्षिका श्रीमती ए.एच.राऊत,बालिका गाडेकर,आशा लोहार,जगदेवी कोळी,मंगलाताई बारकुल,संघर्ष घोडके,उत्कर्ष घोडके,सहशिक्षक बारकुल एस.एस,सोनके जे.एस,शेख ए.सी, विक्रम मायाचारी ,पाटील एस.एस,पवार एस.जे, पवार डी.बी,टोंपे एस.पी,सागर व्ही.आर,राऊत ए.एच,सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन