September 21, 2026

वंचित बहुजन आघाडीत हजारो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

  • कळंब – शहरातील शुभमंगल कार्यालय येथे दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी वंचित बहूजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष
    प्रविण (दादा) रणबागुल यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
    कळंब तालुक्यामधील लाॅयन्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कुणाल मस्के यांच्या सोबत पंचायत समितीचे माजी सभापती महादेव कांबळे यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.
    यावेळी कुणाल मस्के मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश करताना बहूजन,दलित,ओबीसी,मुस्लिम समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देणार आहे.
    या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल यांनी या देशात व महाराष्ट्रातील होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तसेच भाजप नेते आमदार यांनी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार तसेच मराठा समाजातील लोकांवर मराठा आरक्षण संदर्भातील मोर्चा वर गोळीबार व लाठीमाराचा निषेधार्थ तसेच महाराष्ट्र राज्यातील शासनकर्ते यांनी आपली जबाबदारी म्हणून गृहमंत्री व मुख्यमंत्री यांनी राजीनामा देणे योग्य असून या हुकुमशाही ने महाराष्ट्र व संपुर्ण लोक अत्यंत भीतीने जगत आहेत असे वाटते.या परिस्थितीला बदलायचे असेल तर अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीला सहकार्य करावे असे आवाहन केले. या वेळी धाराशीव जिल्हा प्रभारी मराठवाडा महासचिव अ‍ॅड.रमेश गायकवाड,जिल्हा प्रमुख बी.डी. शिंदे,जिल्हा नेते अनिल हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक जिल्हा प्रमुख शितल चव्हाण,जिल्हा प्रवक्ते प्रा.के.टी. गायकवाड,प्रा.अरविंद खांडके, अरुण गरड, श्रीकांत राऊत,डि. टी. वाघमारे, शिवाजी कांबळे हे प्रमुख पाहुणे होते.
    यावेळी कुणाल मस्के,सनी मस्के, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती कांबळे महादेव,आकाश गायकवाड,अमन भाई शेख, संदीप सोनवणे,कुंदन कदम,महेश गायकवाड,धनंजय ताटे, विक्की वाघमारे, वाजेद तांबोळी, अक्षय लांडगे, विश्वजीत मुंडे, समाधान बचूटे,आनंद कदम, शुभम गायकवाड,भाऊ सावंत, विशाल गाडे, कुंदन कदम,यशवंत सेनेचे ज्ञानेश्वर लिके,अनिल शिंपले व ईतर असंख्य कार्यकर्ते यांनी यावेळी प्रवेश केला.
error: Content is protected !!