August 9, 2025

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांनी कमलाकर शेवाळे सन्मानित

  • संभाजीनगर – दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञान प्रसार विद्यालयाचे सहशिक्षक शेवाळे कमलाकर यांना समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्रीमती.जयश्री सोनकवडे – जाधव,पोलिस निरीक्षक
    श्रीमती कांचन मिरधे,सचिन मिरधे,प्रगती संस्थेचे संस्थापक रोहित गिरी व श्रीमती श्वेता गिरी
    यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
    याप्रसंगी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
    तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेल आदर्श शिक्षक वृंद व प्रमुख मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते .
error: Content is protected !!