कळंब (महेश फाटक ) – शहरातील शिवसैनिकांनी दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा जिवन प्रवास असलेल्या मुख्यमंत्री यांचा वाढदिवस कळंब शहरातील शेकडो ॲटोरिक्षा चालकांसोबत सर्व शिवसैनिकांनी मिळून साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून सर्वा रिक्षाचालकांना गुलाबाचे फुल, पेन व डायरी दिली.नंतर सर्व रिक्षाचालकांना चहापान केले.यावेळी एकनाथ शिंदे आगे बढो,एकनाथ शिंदे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक निनादून गेला. यानंतर सर्व रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घातली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, सुधीर भवर, सागर मुंडे, मंदार मुळीक,शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे तालुकाप्रमुख वसीम शेख, शहरप्रमुख इम्रान सय्यद, शंकर वाघमारे, शकील काझी, सिध्दू शिंगणापूरे, शक्ती नलावडे, उत्रेश्वर बप्पा चोंदे, संघर्ष कांबळे, धम्मा विद्यागर, नियामत पठाण, मोहसीन शेख, बंडू तावरे, संतोष एखंडे, अकमल काझी, जावेद सौदागर, आकाश हौळ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले